288,899 views 207 on YTPak
8,182 128

Published on 17 Sep 2016 | 4 months ago

Source Link : www.youtube.com/watch
Video Courtesy : TwoBrotherzProduction
Captured by : Shreekant S Batale, Pune
Date : 15-09-2016 (Anant Chaturdashi)
Location : Shagun Chowk, Pune.


----------------------------------------------- गणपती मिरवणुकीत पुण्यात पुणेकरांनी प्रचंड गर्दीत अम्ब्युलन्स ला रास्ता मोकळा करून दिला....

News : विसर्जन मिरवणुकीत माणुसकीचं दर्शन, अॅम्ब्युलन्सला मार्ग
पुणे : स्थळ पुणे, गणपती विसर्जन मिरवणुकीची धूम, ढोल-ताशा पथकाचा नाद, भाविकांची तुफान गर्दी आणि त्यातच येणारा अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज. मात्र तरीही एवढ्या प्रचंड गर्दीतून सहज मार्ग काढून अॅम्ब्युलन्स निघून जाते. पुणेकरांच्या माणुसकीचे दर्शन घडवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील टिळक चौकामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत इतर ढोल-ताशा पथकांप्रमाणे नादब्रह्म पथकाचाही ताल सुरु होता आणि त्याच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत होती. मात्र गर्दीमधील एकाला त्रास होऊ लागल्याने त्याला घेऊन जात असलेल्या अॅम्ब्युलन्सला हजारो पुणेकरांनी तातडीने रस्ता करुन दिला. नादब्रह्म पथकाने वादन थांबवलं. कार्यकर्ते, स्वयंसेवक, पोलिसांच्या मदतीने काही क्षणात हजारोंची गर्दी दोन भागात विभागली. अवघ्या काही सेकंदात मधल्या रस्त्यातून अॅम्ब्युलन्स कोणत्याही अडथळ्याविना निघून गेली. यानंतर पुन्हा मिरवणुकीला त्याच जल्लोषात सुरुवात होते.

एका इमारतीच्या छतावरुन हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीचं शूटिंग करत असताना ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली. गडबड गोंधळ, ढकलाढकली, चेंगराचेंगरी न होता ही अॅम्ब्युलन्स रुग्णालयाकडे निघून जाते.

Loading related videos...